Skip to main content

परमेश्वर कोठे आहे Parmeshwar kuthe ahe

परमेश्वराला शरण जावे, हे ठिक आहे
परंतु परमेश्वर कोठे आहे ....?
--------------------------------------------
भगवान श्रीकृष्ण म्हणतात
" सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज "
सर्व धर्माचा त्याग करून तू मला एकट्याला शरण ये. परमेश्वराला शरण जायचे म्हणजे कुठे शरण जायचे ? त्या परमेश्वराला शरण जायचे म्हणजे काय ?  तो परमेश्वर कुठे आहे ? त्याची पूजा कशी करायची ?  नमस्कार व वंदन कुठे करायचे ?
अव्यक्त परमेश्वर सर्वव्यापक आहे.  मग कुठेही शरण जायचे काय..?

अव्यक्त परमेश्वर सर्वव्यापक असला तरी  परमेश्वराला शरण जायचे ५ ठिकाणे आहेत. त्या पाच ठिकाणी परमेश्वराची आराधना  वंदन पूजन नमस्कार करावा असे सर्वज्ञ श्री चक्रधर म्हणतात.....

💡खालील ५ ठिकाणी आराधना
वंदन पूजन नमस्कार करून परमेश्वराला शरण जावे .....

१) पाच नाम
२) परमेश्वराचे ब्रह्मविद्या ज्ञान
३) परमेश्वराची क्रुपा शक्ती
४) परमेश्वराची प्रसन्नता
५) वचनरूप परमेश्वर

या परमेश्वराला शरण जाण्याच्या ५ जागा आहेत. स्थान,  प्रसाद,  भीक्षुक, वासनिक या चार साधनात या जागा आढळतात व वचनरूप परमेश्वराचे दास्य याची जागा स्वतः च्या समर्पणामध्ये आहे....

💡 पाच नाम

पाच नाम हे वासनिक,  भीक्षुक,  ज्ञानीयाच्या ह्रदयात स्थित असतात....कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात " देव दुर्लभ का देवाला आठविणारे दुर्लभ आहेत " म्हणून वासनिक भिक्षुक ज्ञानीयाच्या ह्रदय मंदिरातील पंचनाम पंचक्रुष्ण आमचे आराध्य दैवत आहे.  त्या ह्रदयस्थ पंचक्रुष्णाला शरण जाऊन त्याचे भजन पूजन वंदन करावे.

💡 ज्ञान शक्ती

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात
"  ज्ञान पूज्य आहे  " म्हणजे ज्ञानाची पूजा करावी.  हे ज्ञान कुठे आहे ? तर ते ज्ञानीयाच्या ह्रदयात बोध रूपाने आहे.  म्हणून "  अधिकरण ज्ञानीयाच्या ह्रदयातील ज्ञान शक्ती चे भजन पूजन करावे. ज्ञान बोधाच्या रूपाने परमेश्वर ज्ञानीयाच्या अंतःकरणात शास्त्र चर्चेप्रसंगी आसनस्थ असतात. म्हणून ज्ञानीयांचे अधिकरणांचे भजन पूजन करणे म्हणजे त्यांच्या ह्रदयात स्थित असलेल्या ज्ञान शक्तीचे पूजन होय.  ही ज्ञान शक्ती परमेश्वराचा अवयव असल्या मुळे ज्ञान शक्तीचे पूजन म्हणजे परमेश्वराचे पूजन होय. ज्याच्या ह्रदयात परमेश्वराचे पाच नाम आहेत. त्या पाच नामाला वंदन करणे म्हणजे परमेश्वराला वंदन करणे होय....
व ज्या ज्ञानीयाच्या ह्रदयात ईश्वराचे ज्ञान आहे त्या ज्ञानाला वंदन म्हणजे परमेश्वराला वंदन होय.कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात
"  नही ज्ञानेन सद्रुश्यं पवित्रमिह विद्यते.. "
ज्ञानाइतकी पवित्र वस्तू या जगात दुसरी कोणतीही नाही. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात - " ज्ञान पूजनीय आहे अन् ज्ञानव्रद्ध तो सर्वत्र पूजनीय आहे  " या ज्ञानाचे पूजन म्हणजेच ईश्वर पूजन होय..

जया ज्ञानीयाचेनी दर्शने
पापा होती पुरश्चरणे
तयाचा अव्हेर न करावा कव्हणे
भलते न वंदावे....

💡 क्रुपा शक्ती

दया मया क्रुपा करूना यांपैकी "क्रुपा शक्ती"
परमेश्वर अवताराने प्रसन्न होऊन भक्तांना दिलेल्या प्रसादात क्रुपा शक्तीचा आढळ आहे.  या " प्रसाद वंदना " त परमेश्वराची क्रुपा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात  ".... प्रसाद सेवेतव पुरूष धर्मी दक्ष होय... गेले सत्व ये... सन्निधान द्यावयाची प्रवृत्ती उपजे..." क्रुपा शक्ती परमेश्वराचे एक अंग असल्यामुळे प्रसाद वंदनाच्या ठाई स्थीत क्रुपा शक्तीला शरण जावे.  नमस्कार वंदन करावे....

💡 प्रसन्नता

तीर्थस्थाने ही परमेश्वराच्या प्रसन्नतेने व क्रुपा शक्तीने ओतप्रोत आहेत.  सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात -
" अव्यक्त प्रसन्नता परमेश्वर निक्षेपतात व नंतर आपला संबंध देतात.  म्हणून संबंध वंदनीय आहेत. " 1650 तीर्थस्थानाच्या ठायी परमेश्वराची प्रसन्नता व क्रुपा शक्ती आज ही स्थीत आहे.  त्या तीर्थस्थानात स्थीत क्रुपा शक्ती व प्रसन्नता परमेश्वराचे अंग अवयव असल्याने त्याचे वंदन पूजनn व नमस्करण करावे....

💡वचनरूप परमेश्वर
(आचार हीच पूजा) अर्थात कर्म हीच पूजा..

परमेश्वर अवताराने सांगितलेल्या आचार धर्माचे जीवनात पालन करणे हे परमेश्वर अवताराला केलेले वंदन पूजन आर्चन आराधना नमस्कार होय.  हीच शरणागती होय.

अशाप्रकारे स्थान प्रसाद भीक्षुक वासनिक व परमेश्वर प्रणीत आचार धर्म म्हणजेच वचनरूप परमेश्वर या पाच स्थळावर परमेश्वराला शरण जावे.....

हा " सर्व धर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज "
या भगवान श्रीकृष्णाच्या वचनाचा अर्थ आहे.  जो अशारितीने परमेश्वराला शरण येईल त्याला कदापि मरण नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्पष्टच म्हणतात... "  एथ शरण आलेया काई मरण असे :"  आम्हाला शरण आलेल्याची दुखापासून आम्ही सोडवणुक करीत असतो... 

Comments

Popular posts from this blog

Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav

Watch on YouTube here: Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos

Role Of Production Officer In Compression।Compression Officer

via IFTTT

बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan

Watch on YouTube here: बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos