Skip to main content

Posts

Showing posts with the label पोथी

पोथी

।। वंदे श्री चक्रधरम्।।  ( महानुभावंची "पोथी" या विश्वालातिल पवित्र सोहळा) महंत श्री जयराजशास्री (साळवाडी ) "पोथी "हा शब्द ऊच्चारल्या बरोबर समाजतल्या प्रत्येक सात्विक माणसाच्या मनामधे श्रध्दा जागृत होते. कारण "पोथी"बद्दल बहुतांशी लोकांच्या मनामधे अतिशय आदर एवं प्रेम आहे.पुर्वीच्या काळी,आजही श्रावण महिना आंरभ झाला की, प्रत्येक भाविक आपल्या घरात "पोथी"लावयचा.मग तो पांडवप्रतापअसेल, किंवा सिद्धांतबोध आदि ग्रंथ,अशा महिन्यात घरात सर्व परिवाराला घेऊन वाचयचे, एखादा अर्थ देखिल सांगायचा. अर्थ सांगणारा देखिल !तितकाच सांगण्याचा बाबतीत तरबेज एवं निष्णात असायाचा!श्रोतावर्ग देखिल ऐकण्यात रमून जायचा!इत्तर सांप्रादायात अशा "पोथ्या" वाचतांना ऐकतो. महानुभाव संप्रादायात "पोथीला"अनन्यसाधारण महत्व आहे.नव्हेतर "पोथी" एक महानुभावियांचा पर्वकाळच "असतो. महानुभाव पंथात "पोथी"ची तारीख एक ते दीड वर्ष आगोदर घोषीत करण्यात येते.कारण तयारी करण्या साठी वेळ मिळावा हा त्या मागचा ऊद्देश आसतो. त्यामुळे प्रत्येक श्रोता वर्गाला &q