Skip to main content

Posts

Showing posts with the label गोविंद प्रभु आरती

Govind Prabhu Aarti गोवींद प्रभु आरती

 Govind prabhu aarti,govind prabhu avataar din     श्री गोविंदप्रभु हे ऋद्धिपुरा पासून सात कोसावर असलेल्या  काटसूरा येथे अनंतनायक व नेमाईसा या कण्व ब्राह्मण  दाम्पत्याच्या पोटी भाद्रपद शुक्ल अष्टमीला  रात्रौ दहा वाजता शके ११०९ मध्ये अवतरले .   श्रीप्रभु एका वर्षाचे झाल्यावर त्यांचे आई - वडिल  निधन पावले .  तेव्हा ऋद्धिपूरात  राहणारे नेमाईसाचे भाऊ व बहिण यांनी काटसूरा येथे येऊन त्या बालकाला आपल्या  गावी आणले , त्यांचे सातव्या वर्षी  मुंजिबंधन करून त्यांना  संस्कृत विद्यालयात घातले . संस्कृतचा पूर्ण अभ्यास केला , वेदउपनिषद् कंठस्त केले , त्या नंतर त्यांनी द्वारकेस जाऊन श्री चक्रपाणी महाराज पासून अनुग्रह घेतला ( ज्ञानशक्तिचा स्विकार केला ) .  पुन्हा ॠद्धिपूराला  येऊन त्यांनी आपले अवतार कार्य सुरु केले . त्यांच्या  पासून श्री चक्रधर स्वामींनी अनुग्रह घेतला. अर्थात  श्री गोविंदप्रभू हे श्री चक्रधरस्वामीचे गुरू होत .     श्री गोविंदप्रभूने स्वीकार केलेला देह वेडापिसा होता , म्हणुन ते वेड्यापिशा सारखे वर्तन करीत असत , परंतु हा परमेश्वराचा  पारदर्शी अवतार होय . ते वेड्यापिशासारखे वर्त