Skip to main content

Posts

Showing posts with the label Lila

Lila Mahanubhav Panth

॥नाथोबांकरवी टिळा जानवे पुरविणे ॥ ------------------------ अणकैय्येच्या देवळाकडे नाथोबाला घेऊन स्वामी फिरायला गेले.तेथे थोडा वेळ बसले असता स्वामी म्हणाले बटिका ! आपण भिक्षेला जाताना गंध -- टिळा का लावतां ? जानवे का घालता ? नाथोबा म्हणाले जी जी ! चोखट भिक्षा मिळावी या कारणे.भिक्षेला जाताना गंध टिळा लावण्याचे आणि जानवे घालण्याचे प्रयोजन असते जी. हे ऐकून स्वामी म्हणाले तुम्हाला गंध टिळा लावल्याशिवाय आणि जानवे घातल्याशिवाय भिक्षा मिळत नाही का ? हे ऐकून नाथोबा खाली मान घालून गप्प होतात. स्वामी म्हणाले जा पाहू ! आज गंध टिळा आणि जानव्याशिवाय भिक्षा मागा ! नाथोबा म्हणाले जी जी ठीक आहे पण या गंध टिळ्याचे आणि जानव्याचे काय करू ? स्वामी म्हणाले हे टिळे जानवे कोठे तरी गाडून या आणि अनकैयेच्या देवळात जाऊन बसा. नाथोबा म्हणाले जी आणि दंडवत करतात.स्वामी उठून बिर्हाडी येतात. स्वामीनी सांगितल्याप्रमाणे नाथोबा झुडूपाशेजारी खड्डा खोदून कपड्यात ठेवलेली गंधाची काडी,जानवे काढून पहातात आणि परत गुंडाळून खड्ड्यत पुरून ठेवतात वर एक दगड निशाणी म्हणून ठेवतात. मग अनकैय्येच्या देवळात येऊन बसतात.थोडा वेळ वा