माहादाइसा वजीरी घडीतां पाहाणें चौकासी वाव्य ( वायव्य ) कोणीं: बाहीरिला आंगा रवणीयवरि : गोसावीयांसि आसन असे: गोसावी आंगी लेइले असति : मोकळे कसे : आंगीचे दोन्ही पदर मागुतें नेउनि: पुढां आणुनि गांठि पाडिली असे : आंगीचीया बाहीया वरतीया केलीया असति : श्रीमुगुटीं टोपरें: मोकळीं कानाउवें : फुटेयाचे दोन्हीं पदर श्रीमुगुटावरि : ऐसें उतराअभिमुख गरूड आसन : डावां श्रीकरीं काळी इट : उजिवां श्रीकरीं चीतपळ : उजवीए श्रीचरणचेनि आंगुठेन दडपुनि : उजवीए श्रीकरिचीया चीतपळाकरूनि: वजीरी घडिली : मग दोहीं श्रीकरीं चीरेयावरि सरिसी करीत असति: आंगीचीया वरतीया बाहीया करीति: द्रीष्टी अवळोकीति: मागुती घडीति: माहादाइसीं म्हणीतलें: "नागदेया नागदेया: आरूता ए हो : गोसावी लीळा करीताति ते पाहे:" ऐसी माहादाइसां भेटि जाली: "जी जी: हे काइ कीजत असीजे ?" *"बाइ: हे वजीरी घडीत असीजे:"* "जी जी: वजीरी म्हणिजे काइ ?" *"बाइ: वजीरी म्हणिजे वारितुरंग:"* "जी जी: वारितुरंग म्हणीजे काइ ?" *"बाइ: वारितुरंग एक घोडे: दीपीं असति:
Mahanubhav panth महानुभाव पंथ Welcome all to our blog! If any concern please comments us and do not hesitate to like shar My facebook page: fb.me/knowledgedp Linked in:https://www.linkedin.com/in/ram-fajge-161b5548 You Tube: https://www.youtube.com/channel/UCDIUUuRv39zJU5UXp1hsTWg? Twitter:https://mobile.twitter.com/ramfajge Instagram:https://www.instagram.com/ramfajge/ https://www.knowledgedp.ml https://mahanubhavpanth1.blogspot.com