माहादाइसा वजीरी घडीतां पाहाणें
चौकासी वाव्य ( वायव्य ) कोणीं: बाहीरिला आंगा रवणीयवरि : गोसावीयांसि आसन असे: गोसावी आंगी लेइले असति : मोकळे कसे : आंगीचे दोन्ही पदर मागुतें नेउनि: पुढां आणुनि गांठि पाडिली असे : आंगीचीया बाहीया वरतीया केलीया असति : श्रीमुगुटीं टोपरें: मोकळीं कानाउवें : फुटेयाचे दोन्हीं पदर श्रीमुगुटावरि : ऐसें उतराअभिमुख गरूड आसन : डावां श्रीकरीं काळी इट : उजिवां श्रीकरीं चीतपळ : उजवीए श्रीचरणचेनि आंगुठेन दडपुनि : उजवीए श्रीकरिचीया चीतपळाकरूनि: वजीरी घडिली : मग दोहीं श्रीकरीं चीरेयावरि सरिसी करीत असति: आंगीचीया वरतीया बाहीया करीति: द्रीष्टी अवळोकीति: मागुती घडीति: माहादाइसीं म्हणीतलें: "नागदेया नागदेया: आरूता ए हो : गोसावी लीळा करीताति ते पाहे:" ऐसी माहादाइसां भेटि जाली: "जी जी: हे काइ कीजत असीजे ?" *"बाइ: हे वजीरी घडीत असीजे:"* "जी जी: वजीरी म्हणिजे काइ ?" *"बाइ: वजीरी म्हणिजे वारितुरंग:"* "जी जी: वारितुरंग म्हणीजे काइ ?" *"बाइ: वारितुरंग एक घोडे: दीपीं असति: ते उदकावरि चालति: तैसी हे वजिरी: बाइ: उदकावरि तरंगाए म्हणौनि वारितुरंग म्हणिजे :"*।।
<iframe style="width:120px;height:240px;" marginwidth="0" marginheight="0" scrolling="no" frameborder="0" src="//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?ServiceVersion=20070822&OneJS=1&Operation=GetAdHtml&MarketPlace=IN&source=ss&ref=as_ss_li_til&ad_type=product_link&tracking_id=knowledgedp-21&language=en_IN&marketplace=amazon®ion=IN&placement=B07C6XDHKW&asins=B07C6XDHKW&linkId=6f1025449edd86f8e570652c9c8a4a6d&show_border=true&link_opens_in_new_window=true"></iframe>
Comments
Post a Comment