Skip to main content

प्रार्थना

 *प्रार्थना*
*मला वाटते ऋद्धिपुरासी जावे |*
*प्रभू चरणी मस्तक हे ठेवावे ||*
*अर्थ--* मला असे वाटते, त्या ऋद्धपुराला जावून श्री गोवुंदप्रभूंच्या चरणावर आपल मस्तक ठेवावे.

*तृषा लागली स्वामींचे तीर्थ घ्यावे |*
*लडीवाळ मी मागतो प्रेम द्यावे ||*
*अर्थ--*मला तहान लागल्यामुळे स्वामींचे चरणोदक घ्यावे असे वाटते. प्रेमपणाने मी मागणे मागतो मला आपले प्रेमदान द्यावे .

*महाद्वारी उभे प्रभू चरणचारी |*
*क्रीडे राजमठी त्रिपुरूषी आवारी ||*
*अर्थ--*महाद्वारामध्ये प्रभू बिन पादत्राणाचे उभे आहे. राजमठामध्ये असलेल्या त्रिपुरूष मठाच्या आवारात श्रीप्रभूबाबा खेळ क्रीडा करत आहेत.

*विचारूचिरा उखळी गुढेयाशी |*
*नमस्कार माझा जडा चेतनासी ||*
*अर्थ--*ज्या चिर्यावर बसून श्रीप्रभूबाबा विचार करीत असे तो विचार चिरा . ज्या उखळीमध्ये तेल आणि रोटी खायचे ती उखळी प्रतिदिनी गुढ्यासी खेळ खेळायचे तो गुढा . या व्यतिरिक्त जे जड - चेतन आहे त्यांना माझा दंडवत !

*चिरेबंदी वाडा प्रभू राऊळांचा |*
*महाद्वारी थाट चहू साधनांचा ||*
*अर्थ--* श्रीप्रभूबाबांचा वाडा जो घडीव दगडांचा बांधलेला आहे . महाद्वार जे आहे ते चारी साधनाने शोभून दिसते आहे.

*सखा नांदतो देव भक्तिजनाचा |*
*नमस्कार साष्टांग या राघवाचा ||*
*अर्थ--* आमचा स्वामी त्या ऋद्धपुरामध्ये नांदतो म्हणजे राज्य करीत आहे. तुमच्या चरणी राघव नावाचा भक्तांचा साष्टांग दंडवत !
दंडवत प्रणाम
god emage

Comments

Popular posts from this blog

Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav

Watch on YouTube here: Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos

Role Of Production Officer In Compression।Compression Officer

via IFTTT

बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan

Watch on YouTube here: बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos