Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

प्रार्थना

 *प्रार्थना* *मला वाटते ऋद्धिपुरासी जावे |* *प्रभू चरणी मस्तक हे ठेवावे ||* *अर्थ--* मला असे वाटते, त्या ऋद्धपुराला जावून श्री गोवुंदप्रभूंच्या चरणावर आपल मस्तक ठेवावे. *तृषा लागली स्वामींचे तीर्थ घ्यावे |* *लडीवाळ मी मागतो प्रेम द्यावे ||* *अर्थ--*मला तहान लागल्यामुळे स्वामींचे चरणोदक घ्यावे असे वाटते. प्रेमपणाने मी मागणे मागतो मला आपले प्रेमदान द्यावे . *महाद्वारी उभे प्रभू चरणचारी |* *क्रीडे राजमठी त्रिपुरूषी आवारी ||* *अर्थ--*महाद्वारामध्ये प्रभू बिन पादत्राणाचे उभे आहे. राजमठामध्ये असलेल्या त्रिपुरूष मठाच्या आवारात श्रीप्रभूबाबा खेळ क्रीडा करत आहेत. *विचारूचिरा उखळी गुढेयाशी |* *नमस्कार माझा जडा चेतनासी ||* *अर्थ--*ज्या चिर्यावर बसून श्रीप्रभूबाबा विचार करीत असे तो विचार चिरा . ज्या उखळीमध्ये तेल आणि रोटी खायचे ती उखळी प्रतिदिनी गुढ्यासी खेळ खेळायचे तो गुढा . या व्यतिरिक्त जे जड - चेतन आहे त्यांना माझा दंडवत ! *चिरेबंदी वाडा प्रभू राऊळांचा |* *महाद्वारी थाट चहू साधनांचा ||* *अर्थ--* श्रीप्रभूबाबांचा वाडा जो घडीव दगडांचा बांधलेला आहे . महाद्वार जे आहे ते चारी सा

Govind Prabhu Aarti गोवींद प्रभु आरती

 Govind prabhu aarti,govind prabhu avataar din     श्री गोविंदप्रभु हे ऋद्धिपुरा पासून सात कोसावर असलेल्या  काटसूरा येथे अनंतनायक व नेमाईसा या कण्व ब्राह्मण  दाम्पत्याच्या पोटी भाद्रपद शुक्ल अष्टमीला  रात्रौ दहा वाजता शके ११०९ मध्ये अवतरले .   श्रीप्रभु एका वर्षाचे झाल्यावर त्यांचे आई - वडिल  निधन पावले .  तेव्हा ऋद्धिपूरात  राहणारे नेमाईसाचे भाऊ व बहिण यांनी काटसूरा येथे येऊन त्या बालकाला आपल्या  गावी आणले , त्यांचे सातव्या वर्षी  मुंजिबंधन करून त्यांना  संस्कृत विद्यालयात घातले . संस्कृतचा पूर्ण अभ्यास केला , वेदउपनिषद् कंठस्त केले , त्या नंतर त्यांनी द्वारकेस जाऊन श्री चक्रपाणी महाराज पासून अनुग्रह घेतला ( ज्ञानशक्तिचा स्विकार केला ) .  पुन्हा ॠद्धिपूराला  येऊन त्यांनी आपले अवतार कार्य सुरु केले . त्यांच्या  पासून श्री चक्रधर स्वामींनी अनुग्रह घेतला. अर्थात  श्री गोविंदप्रभू हे श्री चक्रधरस्वामीचे गुरू होत .     श्री गोविंदप्रभूने स्वीकार केलेला देह वेडापिसा होता , म्हणुन ते वेड्यापिशा सारखे वर्तन करीत असत , परंतु हा परमेश्वराचा  पारदर्शी अवतार होय . ते वेड्यापिशासारखे वर्त

लीळा माहादाइसा वजीरी घडीता पाहाणे

माहादाइसा वजीरी घडीतां पाहाणें      चौकासी वाव्य ( वायव्य ) कोणीं:  बाहीरिला आंगा रवणीयवरि :  गोसावीयांसि आसन असे:  गोसावी आंगी लेइले असति :  मोकळे कसे :  आंगीचे दोन्ही पदर मागुतें नेउनि:  पुढां आणुनि गांठि पाडिली असे :  आंगीचीया बाहीया वरतीया केलीया असति :  श्रीमुगुटीं टोपरें:  मोकळीं कानाउवें :  फुटेयाचे दोन्हीं पदर श्रीमुगुटावरि :  ऐसें उतराअभिमुख गरूड आसन :  डावां श्रीकरीं काळी इट :  उजिवां श्रीकरीं चीतपळ :  उजवीए श्रीचरणचेनि आंगुठेन दडपुनि :  उजवीए श्रीकरिचीया चीतपळाकरूनि:  वजीरी घडिली :  मग दोहीं श्रीकरीं चीरेयावरि सरिसी करीत असति:  आंगीचीया वरतीया बाहीया करीति:  द्रीष्टी अवळोकीति:  मागुती घडीति:  माहादाइसीं म्हणीतलें:  "नागदेया नागदेया:  आरूता ए हो :  गोसावी लीळा करीताति ते पाहे:"  ऐसी माहादाइसां भेटि जाली:  "जी जी:  हे काइ कीजत असीजे ?"  *"बाइ:  हे वजीरी घडीत असीजे:"*   "जी जी:  वजीरी म्हणिजे काइ ?"  *"बाइ:  वजीरी म्हणिजे वारितुरंग:"*   "जी जी:  वारितुरंग म्हणीजे काइ ?"  *"बाइ:  वारितुरंग एक घोडे:  दीपीं असति:

Datta aarti दत्ताची आरती

shri datta aarti,mahanubhav panth,mahanubhav,devotional aarti,bhaktigeete,marathi aarti,महानुभाव,मराठी आरती,दत्ताची आरती,दत्ताची भक्ती गीते aarti link: https://youtu.be/0ZlkqXnSXLI Thanks for visiting...

जन्माष्टमी श्रावनमासी अष्टमी

दण्डवत प्रणाम जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा ! महानुभाव पंथात जन्माष्टमी फार मोठ्या थाटात साजरी करतात.कृष्ण जन्म,गोपाळकाला,shri krishna aarti marathi,marthi krishna aarti,shri krishna marathi aarti,Gopalkala,Janmashtami. Aarti link: https://youtu.be/KaoTwe0kFlo महानुभाव पंथ You can purchase shree krishna puja accessories with special offer from below link. https://amzn.to/2C9A29J Thanks for visisting....