Skip to main content

Govind Prabhu Aarti गोवींद प्रभु आरती

 Govind prabhu aarti,govind prabhu avataar din



    श्री गोविंदप्रभु हे ऋद्धिपुरा पासून सात कोसावर असलेल्या  काटसूरा येथे अनंतनायक व नेमाईसा या कण्व ब्राह्मण  दाम्पत्याच्या पोटी भाद्रपद शुक्ल अष्टमीला  रात्रौ दहा वाजता शके ११०९ मध्ये अवतरले .

  श्रीप्रभु एका वर्षाचे झाल्यावर त्यांचे आई - वडिल  निधन पावले .  तेव्हा ऋद्धिपूरात  राहणारे नेमाईसाचे भाऊ व बहिण यांनी काटसूरा येथे येऊन त्या बालकाला आपल्या  गावी आणले , त्यांचे सातव्या वर्षी  मुंजिबंधन करून त्यांना  संस्कृत विद्यालयात घातले . संस्कृतचा पूर्ण अभ्यास केला , वेदउपनिषद् कंठस्त केले , त्या नंतर त्यांनी द्वारकेस जाऊन श्री चक्रपाणी महाराज पासून अनुग्रह घेतला ( ज्ञानशक्तिचा स्विकार केला ) .  पुन्हा ॠद्धिपूराला  येऊन त्यांनी आपले अवतार कार्य सुरु केले . त्यांच्या  पासून श्री चक्रधर स्वामींनी अनुग्रह घेतला. अर्थात  श्री गोविंदप्रभू हे श्री चक्रधरस्वामीचे गुरू होत .

    श्री गोविंदप्रभूने स्वीकार केलेला देह वेडापिसा होता , म्हणुन ते वेड्यापिशा सारखे वर्तन करीत असत , परंतु हा परमेश्वराचा  पारदर्शी अवतार होय . ते वेड्यापिशासारखे वर्तन करीत असले तरी त्यांच्या मूळ ज्ञानमय स्वरूपास अज्ञानत्व येत नाही .   असे वर्तन करणे हे त्यांचे नाटक असते , तेथे वास्तवता नाही हे त्यांच्या लीलाचरित्रावरून कळून येईल , श्री गोविंदप्रभूचे सारे आयुष्य चमत्कारिक लीला व हास्य विनोद  करण्यात गेले असले तरी त्यांनी आपल्या आयुष्यात लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला, माणुसकी शिकविली , चातुर्वण्यता नष्ट केली , स्वामी श्रीचक्रधरांनी  सांभाळी घातलेल्या  परिवाराला प्रेमळपणाने  वागविले . त्यांना कोणतेही उणे भासू दिले नाही, इत्यादी कार्ये त्यांच्या ज्ञानमय स्वरुपामुळे घडली अशी अलौकिक शंभर वर्ष व्यतीत करून त्यांनी शके १२०९ मध्ये आपला अवतार संपविला .
लिहण्यात चुकल्यास क्षमस्व
दंडवत प्रणाम
Aarti link:

https://youtu.be/Mv8q6mhXlns

Ram fajge....

Comments

Popular posts from this blog

Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav

Watch on YouTube here: Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos

Role Of Production Officer In Compression।Compression Officer

via IFTTT

बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan

Watch on YouTube here: बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos