Skip to main content

Posts

Showing posts with the label aarti vijanachi

विजनाची आरती,महानुभाव आरती

            *|||| :: आरती विजनाची :: ||||* 🌸 *आरती करितो, चक्रधराला विजनाचा हेत ! आश्विन मासी, शुद्ध नवमीला, बसले अरण्यांत !!धृ !!* 🌸 *अव्यक्तीहून व्यक्त झाला, कर्मक्षितीवरूता ! कृपाशक्तिचा , हेतु पुरविला, चहुदानी दाता ! उभय देखणे, अंगीकरूनी, मानव रूपवंता ! आर्यनागर, गंगेतटाकी, खेळ करी पुरता ! अधिकार पाहूनी, जीवाचा, हिवरळी वरूता ! भक्तीजनाला वचन बोलतो, विधी आचरिता !!१!!* 🌸 *हिंसा निमित्ये शुद्ध, नवमीच्या, दिवशी सत्वर ! नगराबाहेर जाणे, बाइसा, बोले चक्रधर ! बाइसा म्हणे, आज का स्वामी, गमन बाहेर ! रात्र समयी, आल्या देवता, लोळे चरणावर ! महात्मजनाने, त्याग करावा, हिंसेचे वृत्त ! मात्रा घेऊन, बाहेर जाणे, उदईक प्रहरांत !!२!!* 🌸 *गावा पश्चिमे, विहिरी तटाकी, आसनी उपविष्ट ! त्या विहिरीतून, आल्या देवता, शिर ठेवी पुष्ट ! बाइसा म्हणे, शब्द कशाचा, सर्वज्ञांना दृष्ट ! वदे सर्वज्ञ, पूजे देवता, तुम्हा अदृष्ट ! चक्रधरांना, आज्ञा मागून, शिरल्या गावांत ! भक्तीजनांसह, दिवस क्रमिला, भोजन रानांत !!३!!* 🌸 *अस्तमान तव, भोग देवता, सरला नगरीचा ! दीप दर्शनी, आले सर्वज्ञ, समुच्चय भक्तांचा ! पुन्हा देवता, भेटीस