Skip to main content

विजनाची आरती,महानुभाव आरती


            *|||| :: आरती विजनाची :: ||||*


🌸 *आरती करितो, चक्रधराला विजनाचा हेत ! आश्विन मासी, शुद्ध नवमीला, बसले अरण्यांत !!धृ !!*



🌸 *अव्यक्तीहून व्यक्त झाला, कर्मक्षितीवरूता ! कृपाशक्तिचा , हेतु पुरविला, चहुदानी दाता ! उभय देखणे, अंगीकरूनी, मानव रूपवंता ! आर्यनागर, गंगेतटाकी, खेळ करी पुरता ! अधिकार पाहूनी, जीवाचा, हिवरळी वरूता ! भक्तीजनाला वचन बोलतो, विधी आचरिता !!१!!*


🌸 *हिंसा निमित्ये शुद्ध, नवमीच्या, दिवशी सत्वर ! नगराबाहेर जाणे, बाइसा, बोले चक्रधर ! बाइसा म्हणे, आज का स्वामी, गमन बाहेर ! रात्र समयी, आल्या देवता, लोळे चरणावर ! महात्मजनाने, त्याग करावा, हिंसेचे वृत्त ! मात्रा घेऊन, बाहेर जाणे, उदईक प्रहरांत !!२!!*


🌸 *गावा पश्चिमे, विहिरी तटाकी, आसनी उपविष्ट ! त्या विहिरीतून, आल्या देवता, शिर ठेवी पुष्ट ! बाइसा म्हणे, शब्द कशाचा, सर्वज्ञांना दृष्ट ! वदे सर्वज्ञ, पूजे देवता, तुम्हा अदृष्ट ! चक्रधरांना, आज्ञा मागून, शिरल्या गावांत ! भक्तीजनांसह, दिवस क्रमिला, भोजन रानांत !!३!!*


🌸 *अस्तमान तव, भोग देवता, सरला नगरीचा ! दीप दर्शनी, आले सर्वज्ञ, समुच्चय भक्तांचा ! पुन्हा देवता, भेटीस येती, तो दिवस आनंदाचा ! शिरकेशाने, चरण झाडीले, दुर्लभ रज त्यांचा ! राजमठामध्ये, केले अवस्थान, धर्म निरोपिता ! विधी पवित्रे, केले स्वामीने, योग साधनांत !!४!!*


🌸 *लीळाचरित्र, हेची आठवण, नवमीच्या दिवशी ! चतुर्विध साधने, योग्यता, नमस्कार त्यासी ! अनंत दोषी, मी अपराधी, छेदी बंधनासी ! नको अव्हेरू, देवा मजला, धरितो चरणासी ! श्रीदत्तवरदी, आबा जयदेव, दीन मी अवघ्यांत ! भांबीर वंशी , उपाध्य कुळीचा, मठधार जनित !!५!!*


  🙏🌸🙏 *दंडवत प्रणाम* 🙏🌸🙏

        

Comments

Popular posts from this blog

Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav

Watch on YouTube here: Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos

Role Of Production Officer In Compression।Compression Officer

via IFTTT

बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan

Watch on YouTube here: बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos