Skip to main content

Posts

Showing posts with the label prayer

प्रार्थना

 *प्रार्थना* *मला वाटते ऋद्धिपुरासी जावे |* *प्रभू चरणी मस्तक हे ठेवावे ||* *अर्थ--* मला असे वाटते, त्या ऋद्धपुराला जावून श्री गोवुंदप्रभूंच्या चरणावर आपल मस्तक ठेवावे. *तृषा लागली स्वामींचे तीर्थ घ्यावे |* *लडीवाळ मी मागतो प्रेम द्यावे ||* *अर्थ--*मला तहान लागल्यामुळे स्वामींचे चरणोदक घ्यावे असे वाटते. प्रेमपणाने मी मागणे मागतो मला आपले प्रेमदान द्यावे . *महाद्वारी उभे प्रभू चरणचारी |* *क्रीडे राजमठी त्रिपुरूषी आवारी ||* *अर्थ--*महाद्वारामध्ये प्रभू बिन पादत्राणाचे उभे आहे. राजमठामध्ये असलेल्या त्रिपुरूष मठाच्या आवारात श्रीप्रभूबाबा खेळ क्रीडा करत आहेत. *विचारूचिरा उखळी गुढेयाशी |* *नमस्कार माझा जडा चेतनासी ||* *अर्थ--*ज्या चिर्यावर बसून श्रीप्रभूबाबा विचार करीत असे तो विचार चिरा . ज्या उखळीमध्ये तेल आणि रोटी खायचे ती उखळी प्रतिदिनी गुढ्यासी खेळ खेळायचे तो गुढा . या व्यतिरिक्त जे जड - चेतन आहे त्यांना माझा दंडवत ! *चिरेबंदी वाडा प्रभू राऊळांचा |* *महाद्वारी थाट चहू साधनांचा ||* *अर्थ--* श्रीप्रभूबाबांचा वाडा जो घडीव दगडांचा बांधलेला आहे . महाद्वार जे आहे ते चारी सा