Skip to main content

Lila Mahanubhav Panth

॥नाथोबांकरवी टिळा जानवे पुरविणे ॥
------------------------
अणकैय्येच्या देवळाकडे नाथोबाला घेऊन स्वामी फिरायला गेले.तेथे थोडा वेळ बसले असता स्वामी म्हणाले बटिका ! आपण भिक्षेला जाताना गंध -- टिळा का लावतां ? जानवे का घालता ?
नाथोबा म्हणाले जी जी ! चोखट भिक्षा मिळावी या कारणे.भिक्षेला जाताना गंध टिळा लावण्याचे आणि जानवे घालण्याचे प्रयोजन असते जी.
हे ऐकून स्वामी म्हणाले तुम्हाला गंध टिळा लावल्याशिवाय आणि जानवे घातल्याशिवाय भिक्षा मिळत नाही का ?
हे ऐकून नाथोबा खाली मान घालून गप्प होतात.
स्वामी म्हणाले जा पाहू ! आज गंध टिळा आणि जानव्याशिवाय भिक्षा मागा !
नाथोबा म्हणाले जी जी ठीक आहे पण या गंध टिळ्याचे आणि जानव्याचे काय करू ?
स्वामी म्हणाले हे टिळे जानवे कोठे तरी गाडून या आणि अनकैयेच्या देवळात जाऊन बसा.
नाथोबा म्हणाले जी आणि दंडवत करतात.स्वामी उठून बिर्हाडी येतात.
स्वामीनी सांगितल्याप्रमाणे नाथोबा झुडूपाशेजारी खड्डा खोदून कपड्यात ठेवलेली गंधाची काडी,जानवे काढून पहातात आणि परत गुंडाळून खड्ड्यत पुरून ठेवतात वर एक दगड निशाणी म्हणून ठेवतात. मग अनकैय्येच्या देवळात येऊन बसतात.थोडा वेळ वाट पहातात.अस्वस्थपणे उठून दोन चार पावले खड्ड्याच्या दिशेने जाऊन पुन्हा मागे फिरून बसतात.थोड्या वेळाने उठून आजूबाजूला पहात कुणाचे लक्ष नाही याची खात्री करून खड्ड्यापर्यत जातात.काय करू ! आकाशात सूर्य किती वर गेला ते पहातात.उशीर तर झालाच आहे. खड्ड्याकडे जातात इकडे तिकडे पहातात.थोडे थांबून परत येऊन बसतात.चुळबुळ चालुच असते.पुन्हा इकडे तिकडे पहातात.आकाशाकडे पहात दगड बाजूला सारून खड्ड्यात टाकलेले जानवे चंदनाची काडी बाहेर काढतात.चंदन घासून कपाळाला टिळा लावतात.गळ्यात जानवे अडकवतात .इतक्यात एख ब्राह्मण हातात उपहाराचे ताट त्यात तुपाची लहान तांबवटी,दुसर्या हातात पाण्याचा तांब्या घेऊन देवतेला उपहार करायला आला.त्याच वेळी नाथोबाही निघत होते.नाथोबाला पाहून ब्राह्मण म्हणाले भटो थांबा ! भिक्षेला जाऊ नका.देवाला उपहार दाखवितो,मग तुम्हाला देतो.थोडे थांबा !
Dandawat Pranam!....!

Comments

Popular posts from this blog

Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav

Watch on YouTube here: Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos

Role Of Production Officer In Compression।Compression Officer

via IFTTT

बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan

Watch on YouTube here: बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos