Skip to main content

पोथी

।। वंदे श्री चक्रधरम्।। 

( महानुभावंची "पोथी"
या विश्वालातिल पवित्र सोहळा)

महंत श्री जयराजशास्री (साळवाडी )

"पोथी "हा शब्द ऊच्चारल्या बरोबर समाजतल्या प्रत्येक सात्विक माणसाच्या मनामधे श्रध्दा जागृत होते. कारण "पोथी"बद्दल बहुतांशी लोकांच्या मनामधे अतिशय आदर एवं प्रेम आहे.पुर्वीच्या काळी,आजही श्रावण महिना आंरभ झाला की, प्रत्येक भाविक आपल्या घरात "पोथी"लावयचा.मग तो पांडवप्रतापअसेल, किंवा सिद्धांतबोध आदि ग्रंथ,अशा महिन्यात घरात सर्व परिवाराला घेऊन वाचयचे, एखादा अर्थ देखिल सांगायचा.
अर्थ सांगणारा देखिल !तितकाच सांगण्याचा बाबतीत तरबेज एवं निष्णात असायाचा!श्रोतावर्ग देखिल ऐकण्यात रमून जायचा!इत्तर सांप्रादायात अशा "पोथ्या" वाचतांना ऐकतो.

महानुभाव संप्रादायात "पोथीला"अनन्यसाधारण महत्व आहे.नव्हेतर "पोथी" एक महानुभावियांचा पर्वकाळच "असतो. महानुभाव पंथात "पोथी"ची तारीख एक ते दीड वर्ष आगोदर घोषीत करण्यात येते.कारण तयारी करण्या साठी वेळ मिळावा हा त्या मागचा ऊद्देश आसतो. त्यामुळे प्रत्येक श्रोता वर्गाला "पोथी" ऐकण्याची ओढ,एवं अतुरता लागलेली असते.

पोथी"आयोजित करणारी समिती राहाणार्या व्यक्तींची ऊत्तम व्यवस्था ठेवत असतात.मग निवासस्थानाची व्यवस्था असो की, भोजनाची!हि सर्वव्यवस्था "पोथी" आयोजित करणारी समिती करत असते.महानुभावपंथात "पोथीची" वेळ सर्वसाधरण ३ते /५ असते.सकाळपासून कार्यक्रम सुरु असतो. प्रातःकाळी पारायण,ऊदक, नंतर"पोथीवाचकाची"किंवा देवाची"मिरवणूक,पुजनविधी, १२/वाजता देवाची आरती, नंतर सर्व वासनिकासहित सर्व साधुसंतांना भोजन!दोनतास विश्रांती!३ते/५ पोथी आरंभ होते.असा महिनाभर पोथीचा"दिनक्रम ठरलेला असतो. "पोथीच्या" निमित्ताने सेवादास्याचा" लाभाही प्राप्त होत असतो. महानुभावांची "पोथी"म्हणजे प्रत्येक भाविकासाठी एक
" सात्त्विक स्नान" असते. नव्हेतर ज्या परिसरात "पोथी"असते.तो संपुर्ण परिसर पोथीच्या"भाक्तिरसात बुडालेला असतो.पोथी"श्रवण करण्यासाठी  देशभरातून लोक येत असतात.

पोथी" आणी पुस्तकात यात बरेच अंतर आहे.पुस्तकात मानसाने आपले विचार लिहिलेले असतात.पुस्तके ही मनोरंजन म्हणुन वाचली जातात.तसे पाहिले तर पुस्तका बद्दल देखील समाजात वाचण्याची"रुची आहे.

पण "पोथी"सारखी"रुची"!जेवढी रुची पाहिजे तेवढी पुस्तक वाचतांनाआढळुन
येत नाही."पोथीचा"गोडवा काही वेगळाच असतो.हे मात्र तितकेच खरे आहे.

तसे पोथीच्या बाबतीत नाही. "पोथीमधे परब्रम्ह परमेश्वराने निरोपलेले परावाणीचे "ब्रम्हविद्या शास्त्र "आहे. म्हणुन "पोथी"बद्दल महानुभाव पंथातील समाज अतिशय श्रध्दा बाळगून आहे.हे मात्र तितकेच खरे आहे.

पुस्तक,आणि "पोथी" ठेवण्याच्या रचनेत देखील बरेच बदल दिसतात. पोथीला"चांगले वस्र लावलेले असतात.व लाहान मुलाचे हात पुरणार नाही. अशा व्यवस्थित ठिकाणी ठेवतात. तर वाचन करण्या साठी "पोथी" ठेवण्यासाठी एखादा चौरंग किंवा पाट ठेवतात.मग त्यावर"पोथी" ठेवून वाचन करतात. "पोथीची अवहेलना होणार नाही.इतकी काळजी घेतांना दिसतात.पण पुस्तक घरात मात्र कोठेही पडलेले दिसते.

"महानुभाव पंथात "पोथी"ला विषेश महत्व आहे. एखाद्या मंहतांची "पोथी" आहे.असे कळले.तर पंथातील जिज्ञासक वर्ग !एवं अभ्यासक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत होतो. वासनीक वर्ग देखील "पोथीच्या"निमीत्ताने बहुतांशी उपस्थित होत असतो. महानुभाव पंथात शक्यतो दोन वेळ "पोथी" वाचल्या जात असते.दुपारी तिन ते पाच!किंवा सायंकाळी नऊ ते दहा असे दोन सत्र होत असतात.या निमीत्ताने श्रवणाचा बराच लाभ साधकाला होत असतो.त्या बरोबर  साधुदर्शन होत असते.

।।निर्वेदस्तोत्रात वर्णन आलेले आहे.
।।तया ज्ञानीयाचेनी
दर्शने पापा होती पुर्श्चरने।
तयाचाआव्हेरु न करवा कवणे।
नमस करावा भलेतेनी ।।

अशा पोथीला आलेले साधु!ज्यांनी आपले संपुर्ण जीवन परमेश्वराला अर्पण केलेले आहे.असे ज्ञान भक्ती, वैराग्य,संपन्न असलेले !बरेच" ज्ञान वृद्ध तथा वयोवृद्ध "साधुंचे दर्शन पोथीच्या निमित्ताने होत असते.अशा महान विभुतींच्या दर्शनाने आलेल्या वासनींकाना स्वस्थता एवं समाधान प्राप्त होत असते.

तसेच सांयकाळी देवपुजा प्रसदवंदन करण्याचा देखील महालाभ होत असतो. प्रसाद वदंन केल्याने!जीवाच्या ठिकाणी सत्वस्थ भाव निर्माण होत असतो.

अन्नदान..पोथीअवसराच्या प्रसंगी अन्नदानाची  क्रिया!जे लोक अतीशय धार्मिकतने करतात.ते देखील अतिशय भाग्यशाली लोक आहे. कारण "पोथी"च्या अवसर प्रसंगी भरपूर साधुसंत"पोथी" श्रवण करण्यासाठी एकत्रित झालेले असतात.अशा पात्रांच्या ठिकाणी वासनीकांना अन्नदान जर घडले.तर कितीतरी "परमार्थीक लाभ होत असतो. पोथी"मुळेसाधकाला ऊजळता येते. "पोथी"हे एक स्नान" आहे.या मुळे मन,
बुध्दी सहीत ईंद्रीयांची" स्वच्छाता होते.

महानुभाव संप्रदायात विवीध ग्रंथावर पोथी"होत असते. त्यापैकी महात्वाची
काही प्रकरणेआहेत."आचार माळीका, विचार माळीका!दृष्टांतस्थळ,विशेषतः
महावाक्य "एवंथोरलेप्रकरण! या महावाक्य,निर्वचन" पोथी" ऐकण्यासाठी तरुण वर्गा पासून मध्यम,तथा वृद्ध वर्गापर्यंत हाजारोंनी लोक उपस्थित असतात.

"पोथीतील"पाठांगणअसलेला साधक !जेंव्हा "दंडवत हा शब्द ऊच्चारतो!तेंव्हा तो आर्त.. ध्वनी परमेश्वराला प्रार्थना करण्यासाठी असतो.एवं परमेश्वराला अत्यंत आवडीने अळवीण्यासाठी असतो.

दंडवत...या शब्दाच्या ध्वनीने पोथीतील वातावरण अतिशय शुद्ध,एवं पवित्र होते.व "पोथी"आरंभ झाली.असा
हा संकेत श्रोतावर्गाला अप्रत्यक्षरीत्या मिळत असतो.

"पोथीतुन" माणसाला खरे जीवनाचे "ज्ञान कळत असते.फक्त त्यासाठी "श्रद्धा" असावी लागते.

श्रीमद्भवद् गीतेत देखील
"श्रध्देच्या संदर्भात ऊल्लेख आलेला आहे.

।।श्रद्धावाँल्लभते ज्ञानं
तत्परः संयतेन्द्रियः।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति मचिरेणाधिगच्छति।।अ.४/३९.

श्रध्दावान व्यक्तिलाच
 ज्ञान प्राप्त होते.त्यासाठी भगवंताने शर्त ठेवलेली आहे.ती शर्त म्हणजे तो जितेंद्रिय असला पाहिजे. त्याचे ईंद्रीय त्रिगुणात्मक गोष्टीतुन दूर असले पाहीजे. तरच ज्ञानाचा प्रवेश होऊ शकतो.भगवान श्रीचक्रधर स्वामी म्हणतात!

।प्रथम जे आहे.ते विसरा!।
मगच ब्रम्हविद्या तुम्हाला प्राप्त होईल.

संसारातील गोष्टी करत... करत "ब्रम्हविद्या" कधीच प्राप्त होणार नाही.महानुभाव पंथात हा निकष प्रथम पाहिल्या जातो.आजही प्रत्येक आश्रमांनी "पोथी" चालु असते.

काही तथाकथित लोक म्हणतात."पोथी" हे ऊत्पन्नाचे साधन आहे.असी गरळ ओकत असतात.

( पण"पोथी"हे ऊत्पन्नाचे साधन नसून! "उद्धार"करून घेण्याचे एक परमेश्वराचे "प्रवेशद्वार" आहे. )

हे मात्र तितकेच खरेआहे. आणिया संसारातील कोणताही विवेकशील व्यक्ती!ही गोष्ट मात्र नाकारु शकत नाही.

"पोथीमुळे जीवनातील अनेक संशय दुर होतात."पोथी"ही परमेश्वराची ओळख करुन देणारी आहे.पोथीमुळे विकारी मनुष्य,निर्विकारी होतो" पोथीमुळे मनुष्यात खर्या अर्थाने परिवर्तन येते.व तो ज्ञान, भक्ती, वैराग्याने संमृद्ध होतो.

 ज्ञान,भक्ती,वैराग्याची संमृद्धी!हि या विश्वातील खरी श्रीमंती आहे.

म्हणुन महानुभाव पंथात "पोथी"ला अनन्य साधारण महत्त्व आहे.नक्कीच महानुभाव पंथातील "पोथी" बद्दल!जी सर्वांना गोडी निर्माणआहे.तिच्यात अधीक वाढ होईल!असी अपेक्षा व्यक्त करतो.असो दंडवत !

Comments

Popular posts from this blog

Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav

Watch on YouTube here: Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos

Role Of Production Officer In Compression।Compression Officer

via IFTTT

बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan

Watch on YouTube here: बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos