Skip to main content

देवपुजा कशी करावी- महानुभाव पंथ


॥देवपूजा॥

देवपूजा कशी करावी?

षोडशोपचार व पंचोपचार पूजेची माहिती.!

षोडशोपचारपूजा ही सोळा उपचारांनी करावयाची असते. त्यामधे कोणते उपचार असतात. ते कसे अर्पण करायचे

याची थोडक्यात माहीती पाहू….

सर्वप्रथम देवपुजेला बसताना काहि गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

1) पुजेला बसताना कायम धूतवस्त्र(धुतलेले) सोवळे इ. नेसून बसावे.

2) पुजाकरतेवेळी आसनावरती बसावे. जमिनीवर बसू नये. तसेच आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये.

3) कपाळाला गंध / पिंजर इ. लाऊन बसावे.

4) एकाग्र मनाने आणि शांतपणे देवपुजा करावी.

5) देवपूजा करताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, मध्येच उठू नये.

6) देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी.

7) आपल्या डाव्या बाजूला समई व उजव्या हाताला तुपाचे निरांजन ठेवावे.

8) फ़ुले वाहताना कायम देठाकडची बाजू देवाकडे करावी.

9) विड्याची पाने कायम उताणी व देठ देवाकडे असावे त्याचप्रमाणे नारळाची शेंडीसुद्धा देवाकडे असावी.

हे नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मन:शांति लाभेल, घरामध्ये प्रसन्नता येते, वातावरण पवित्र बनते, कुटुंब सुखी होते व आपल्या सद्इच्छा पूर्ण होतात.

षोडशोपचार पूजा – म्हणजे जी पूजा सोळा उपचारांनी केली जाते. सोळा उपचार या प्रमाणे- १) आवाहन. २) आसन ३) पाद्यं. ४) अर्घ्य. ५)आचमन. ६)स्नान. ७) वस्त्र. ८) यज्ञोपवीत ९) गंध. १०) पुष्प. ११) धूप. १२) दीप. १३) नैवेद्य. १४)प्रदक्षिणा. १५) नमस्कार. १६) मंत्रपुष्प.

हे उपचार कसे देवाला अर्पण करावे याची माहिती दिली आहे . तसेच या उपचारां व्यतिरिक्त ज्या गोष्टी पुजेमध्ये येतात त्यापण दिलेल्या आहेत. प्रथम पुजेला बसणार्‍याने आचमन करावे. आचमन म्हणजे – डाव्या हातात पळी घेउन त्याने उजव्या हातावर पाणी ओतणे ते पाणी प्राशन करणे, ही कृती तीन वेळा करून एकदा उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडणे म्हणजे आचमन होय.

तिलक धारण :- कोणत्याही शुभ कार्याला बसताना कपाळी तिलक धारण करावा. स्वत:ला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावा. देवपूजेच्या अंतर्गत कलश, शंख, घंटा, दीप पूजन करावयाचे असते.

प्रथम कलश पूजन करावे. आपण जे पूजेला पाणी वापरतो त्यामधे पुण्यनद्यांचे आवाहन करावयाचे असते. ज्यांना मंत्र ज्ञात नाही त्यांनी स्मरण करावे. व कलशाला गंध, अक्षता, फ़ूल वहावे.

त्यानंतर शंख पूजन करावे:- शंखामध्ये चंद्र, वरूण, प्रजापती, गंगा, सरस्वती इ. देवतांचे सांनिध्य असते. म्हणून त्याला गंध-फ़ुल वाहून नमस्कार करावा. *शंखाला अक्षता वाहू नये.
You Tube channel:
Mahanubhav panth
https://www.youtube.com/channel/UCDIUUuRv39zJU5UXp1hsTWg?

त्यानंतर घंटेचेपूजन करावे. :- देवतांना बोलावण्यासाठी व राक्षसांना घालवण्यासाठी घंटेचे पूजन करावे. घंटा वाजवावी.

दीप पूजन :-जो प्रज्वलीत दीप किंवा समई आहे ती ब्रह्मस्वरूप आहे. त्याच्या पूजनाने आपल्याला आरोग्य प्राप्त होते. म्हणून दीपपूजन करावे व नमस्कार करावा.

शुद्धी :- पूजन झालेल्या शंख, कलश यातील थोडे पाणी एकत्र पळीमध्ये घेउन तुळसपत्र घेउन सर्व पूजासाहित्य व स्वत:वरती प्रोक्षण करावे. (पाणी शिंपडावे)

ध्यान :- ज्यादेवतेची पूजा करणार त्यादेवतेचे मनात स्मरण करावे. रोजची घरातील देवाची पूजा असेल तर आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. ( अनुक्रमणिकेत कुलदेवतांचे ध्यानमंत्र या विषयात पहावे.)

1) आवाहन :- देवाच नाव घेउन नम्रभावाने देवाला बोलावणे. (देवावरती अक्षता वहाव्या.)

2) आसन :- देवाला बसायला आसन देणे.

3) पाद्य :- देवाचे पाय धूणे .

4) अर्घ्य :- गंध, फ़ूल, नाणे, सुपारी एकत्र घेउन पाण्याबरोबर देवाला देणे.

5) आचमन :- देवाला आचमनासाठी पाणी देणे. (मुर्तीवर पळीने पाणी वहावे.)

6) स्नान :- देवाला पाण्याने स्नान घालावे.

पंचामृत स्नान :- प्रथम पयःस्नान म्हणजे – दुधाने देवाला स्नान घालावे. ( नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वाहून नमस्कार करावा. )

दधिस्नान :- देवाला दह्याने स्नान घालावे. (नंतर ………….. नमस्कार करावा.) वरील प्रमाणे.

घृतस्नान :- देवाला तूपाने स्नान घालावे. (नंतर………… नमस्कार करावा.)

मधुस्नान :- देवाला मधाने स्नान घालावे. नंतर…………. नमस्कार करावा.)

शर्करास्नान :- देवाला साखरेने स्नान घालावे. (नंतर…………. नमस्कार करावा.)

गंधोदकस्नान :- देवाला थोडे गंध-पाणी एकत्र करून त्याने स्नान घालुन शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वहावे. व नमस्कार करावा. उदबत्ती, दिवा ओवाळावा. पंचामृत / दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा. व ज्या देवाची पूजा चालू आहे त्या देवाचे स्तुतीपर मंत्र / श्लोक म्हणून देवावर पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक झाल्यावर देवाला सुगंधी द्रव्य / अत्तर इ. स्नान घालून कोमट पाण्याने देवाची मूर्ती स्वच्छ करावी. त्यानंतर देवाला स्वच्छ वस्त्राने पुसून आसनावरती  ठेवावे.

७)वस्त्र :- देवाला कापसाचे वस्त्र वहावे.

८)यज्ञोपवीत :- देवाला जानवे घालावे. व आचमनासाठी आपल्या उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे.

९)चंदन:- देवाला अनामिकेने चंदन लावावे (अनामिका म्हणजे करंगळीच्या बाजुचे बोट.) त्यानंतर देवाला अलंकार असतील  तर घालावे. नसल्यास अक्षता वहाव्या.

परिमलद्रव्य :- हळद, पिंजर, शेंदुर, अबीर यातील उपलब्ध असेल ते देवाला वहावे. (फ़ुलाला अत्तर लाऊन फ़ूल देवाला वहावे.)

१०) पुष्प :- देवाला सुगंधीफ़ुले, हार, गजरे, तुळस, दूर्वा, बेलपत्र वहावे.

११) धूप :- देवाला धूप / उदबत्ती ओवाळणे.

१२) दीप :- देवाला  येथे शक्यतो शुद्धतुपाचे निरांजन ओवाळावे.

१३) नैवेद्य :- देवाला नैवेद्य दाखवावा. जेवणाचा दाखवायचा  असल्यास शक्य झाल्यास केळीच्या पानावर पदार्थ वाढावे. व देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करावे. त्यावर नैवेद्याचे पान ठेउन देवाला नैवेद्य अर्पण करावा. हा नैवेद्य देव घेणार (जेवणार) आहेत अशा स्थितीत केळीचे पान ठेवावे.   हातधुण्यासाठी,  मुखधुण्यासाठी, आचमनासाठी ताम्हनात चार वेळा पाणी सोडावे. देवाला अत्तर लावावे.

तांबूल :- देवाला विडा देणे. (विडा- दोन विड्याची पाने व सुपारी) तसेच सुवर्णपुष्प देणे अशक्य असल्याने एक नाणे ठेवावे.

या विड्यावर वेलची, लवंग, चुना, कात इ. मुखवास पदार्थ सुद्धा ठेवू शकता.

फ़ल :- देवाला श्रीफ़ल(नारळ) किंवा इतर फ़ळे देणे.    त्यानंतर देवाची आरती करावी.

१४) प्रदक्षिणा करावी.(स्वत:भोवती उजव्या बाजूने फ़िरणे.)

१५) साष्टांग नमस्कार करावा.

१६) मंत्रपुष्पांजली :- दोन्ही हातात फ़ुले घेउन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवाच्या चरणाशी फ़ुले अर्पण करावी.

प्रार्थना:- हात जोडून मनुष्य स्वभावानुसार या सेवेत काही राहिले असल्यास अनन्यभावाने देवाची प्रार्थना करावी. क्षमा मागावी.  अशाप्रकारे षोडशोपचारपूजा पूर्ण होते.

  *पंचोपचार पूजा*

पंचोपचारपूजा म्हणजे पाच उपचारांनी जी पूजा करतात, त्याला पंचोपचारपूजा म्हणतात.             यामधे……..

१)गंध :-देवाला गंध लावावे.

२)पुष्प :- देवाला फ़ुले अर्पण करावी.

३) धूप :- देवाला धूप / उदबत्ती ओवाळावी.

४)दीप :- देवाला तुपाचे निरांजन ओवाळावे.

५)नैवेद्य :- देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेउन देवाला नैवेद्य दाखवावा.

(पंचोपचार पूजेत हे पाच उपचार असतात.)

गणेश :- जपापुष्प(जास्वंद), चाफ़ा, दूर्वा, शमी, मोगरा, केवडा इ. सुवासिक फ़ुले. (तुळस भाद्रपद महीन्यात फ़क्त गणेशचतुर्थीला वहावी.)डाळींब, सफ़रचंद, सिताफ़ळ श्रीफ़ल(नारळ) इ. फ़ळे गणेशाला प्रिय आहेत.

शंकर :-धोतर्‍याचे फ़ूल, पिवळी व पांढर्‍या रंगाची फ़ुले, बेलपत्र प्राजक्त इ. तसेच बेलफ़ळ, धोतर्‍याचेफ़ळ, शहाळे(कोवळा नारळ) शंकरांना प्रिय आहेत. *लाल रंगाचे फ़ूल, हार शंकराला वाहू नये.*तसेच महाशिवरात्री व्यतिरिक्त अन्य दिवशी केवडा अर्पण करू नये.

देवी :- चाफ़ा, सायली, जाई-जुई, अष्टर, कृष्णकमळ, सर्व सुवासिक फ़ुले तसेच तुळस, दूर्वा, दवणा व नारळ, महाळुंग, सर्व खावयास योग्य फ़ळे, पंचखाद्य देवीला प्रिय आहेत.

सूर्य :- सर्व लाल रंगाची फ़ुले, व सर्व खाण्यास योग्य फ़ळे सूर्याला प्रिय आहेत.

विष्णू :- सर्व सुवासिक फ़ुले, मंजिरीसहीत तुळस,कवठीचाफ़ा, इ. व सर्व खाण्यास योग्य फ़ळे विष्णूला प्रिय होय.

॥ शुभं भवतु ॥

Comments

Popular posts from this blog

Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav

Watch on YouTube here: Sayankal Pujavsar|सायंकाळ पुजा अवसर|महानुभाव|Mahanubhav Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos

Role Of Production Officer In Compression।Compression Officer

via IFTTT

बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan

Watch on YouTube here: बिजे केलेया श्री चक्रधरा नयनी आल्या आश्रु धारा।Sundar Bhajan Via https://www.youtube.com/channel/UCcZImr64sN4bR4BB_JA82vg/videos